शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका वाढला ; नागरिकांनी घराबाहेर पडू नये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:46 IST

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांण्ड कंट्रोल सेंटर म्हैसेकर व जिल्हाधिकारी यांची भेट

पुणे : गेल्या चार-पाच दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी कोरोना धोका अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांण्ड कंट्रोल सेंटर म्हैसेकर व जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त राजेंद्र मुठे आदी अधिकारी उपस्थित होते.कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चा करुन योग्य ते निर्णय घेण्यात आले. डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले,पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. तर नवल किशोर राम यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन योग्य ती पावले उचलत असून अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. डॉ. के. व्यंकटेशम यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.शेखर गायकवाड यांनी पुण्यातील कोरोना संशयित, पॉझिटिव्ह रुग्ण, हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा-सुविधा आदींबाबत माहिती दिली.पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने कोविड संबंधी एकात्मिक डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून, त्याअंतर्गत दैनंदिन माहिती अद्ययावत आणि मॅपिंग करण्यात येत असून, त्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण उपयोग होत असल्याचे, आयुक्त गायकवाड व रुबल अग्रवाल यांनी सांगितले. बैठकीत कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री, उपलब्ध साधनसामुग्री, पीपीई किट, औषधसाठा तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व डॉक्टरांसाठीच्या आवश्यक सुविधा आदीं विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम