शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : राज्य राखीव दलातील १४ कर्मचारी कोरोनाबाधित; मुंबईत गेले होते बंदोबस्ताला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 21:38 IST

यापूर्वी मुंबईहून बंदोबस्त करुन आलेले १ अधिकारी व ७ जवान कोरोनाचे शिकार झाले होते. ते आता कोरोनामुक्त

ठळक मुद्देराज्य राखीव पोलीस दल तुकडीतील सर्वांची गटागटाने कोरोना चाचणी

पुणे : मुंबई येथील घाटकोपर भागात बंदोबस्ताला गेलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील सी कंपनीचे १४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे गट २ मधील पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मुंबईहून बंदोबस्त करुन आलेले १ अधिकारी व ७ जवान कोरोनाचे शिकार झाले होते. ते आता कोरोनामुक्त झाले आहे.याबाबत सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, राज्य राखीव दलाची सी कंपनीतील १०० जवानांची तुकडी १० एप्रिल रोजी पुण्यातून मुंबईत बंदोबस्तासाठी गेली होती. ही तुकडी २१ मे रोजी पुन्हा पुण्यात परत आली.त्यांना सध्या कंपनीच्या अलंकार हॉल तसेच महापालिकेच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या तुकडीतील सर्वांची गटागटाने कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. सी कंपनीतील १४ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या कंपनीतील आणखी १० जवानांचे अहवाल येणे बाकी आहे.याबरोबर बी कंपनीमधील १०० जवानांना महादजी शिंदे हायस्कुल आणि गिरजे कॉलेज या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी ७७ जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.त्यांच्यापैकी एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. अद्याप २३ जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.यापूर्वी राज्य राखीव दलाची एक तुकडी मुंबईत बंदोबस्ताला गेली होती.त्यातील १ अधिकारी व ७ जवान यांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या ते पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून पुन्हा डयुटीवर कार्यरत आहेत. पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक कंपनी तैनात करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी एकाला त्रास होत असल्याने त्याची तपासणी केल्यावर ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आता हे जवान बरे झाले असल्याची माहिती सहायक समादेशक उत्तेकर यांनी दिली.

 

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई