शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:39 IST

कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आवश्यक

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल,

पुणे : पुणे, मुंबईसह संपूर्ण देशातच कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे.यासाठीच शहरातील सर्व नामांकित डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकारणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड झ्र 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत. तथापि अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुगणालय, पुणे यांनी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी, सदर नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.कोव्हीड झ्र 19 साथीच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झालेली असून ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांनी बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ.संयोगिता नाईक, व राजेंद्र गोळे यांची समन्वयक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे त्यांनी कळविले आहे.----------- पहिल्या टप्प्यात या डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांनी डॉ.भूषण किन्होलकर, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9822097687 ), डॉ.सुमित अग्रवाल ,आॅस्टर ?न्ड पर्ल हॉस्पिटल, पुणे ( मो.क्र. 9822886661 ), डॉ.मुकेश महाजन श्री हॉस्पिटल क्रिटी केअर ?न्ड ट्रामा सेंटर,पुणे ( मो.क्र.9823231238 ) डॉ.श्रीपाद महाडिक पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र.9552664589 ), डॉ.गणेश गोंगाटे, पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9823219497 ) , डॉ.रविंद्र कुटे, पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9840396455), डॉ.अरुणकुमार देशमुख, नोबेल हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9423006073), डॉ.देवाशिष बॅनर्जी, नोबेल हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 8766897988) , डॉ.रणजित देशमुख जहांगीर हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9767391703 ), डॉ.सुशिल गांधी ,जहांगीर हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9850932358 ) , डॉ.अश्पक बांगी, जीवनरेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, देहूरोड , पुणे ( मो.क्र. 7972700600 ) , डॉ.चेतन पाटील, एमएमएफ रत्ना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र.9820267983), डॉ.राखी दत्ता, साधु वासवानी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 8007200081 ),डॉ.शेफाली चव्हाण, साधु वासवानी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 7756093545) , डॉ.श्रीपाद कोरे, विराज हॉस्पीटल, लोणीकाळभोर, पुणे ( मो.क्र.8999076147) इत्यादी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत कार्यालयीन आदेश पारित केलेला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामdoctorडॉक्टर