शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

Corona virus : पुणे महापालिकेने पगारवाढ दिल्यावरच रिक्त पदांसाठी डॉक्टरांसाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 12:30 IST

कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टरांनी सुरुवातीला भरती प्रक्रियेकडे फिरवली होती पाठ 

ठळक मुद्देमहापालिकेने सुधारित जाहिरात दिल्यानंतर पगारवाढ व इतर सुविधा दिल्याने प्रतिसाद चांगला

पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार जाहिरात देऊनही, कोरोनाच्या भीतीने अनेक डॉक्टरांनी महापालिका सेवेत येण्यास उदासिनता दाखविली आहे.अखेर महापालिकेने लाखो रूपयांमध्ये पगार व विशिष्ट कालावधीचा करार आदी सुविधा देऊन पुन्हा जाहिरात दिल्याने, आजमितीला ही रिक्त पदे भरती प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीनंतर या सर्व जागा भरल्या जातील, अशी आशा आता आरोग्य विभागाला आहे.     आरोग्य विभागातील २९ विभागात वर्ग एकची १२० तर वर्ग दोनची ५७ पदे रिक्त आहेत. या सर्व पदांकरिता पूर्वी दिलेल्या जाहिरातीस प्रतिसाद देत १ हजार १७ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र प्रत्यक्षात मोजक्याच जागा भरल्या गेल्या. परिणामी २९ जूनला पुन्हा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार, फिजिशियन (२० जागा), इन्टेसिव्हिस्ट (१० जागा), आयसी़यु़फिजिशियन (१० जागा), पेडियाट्रिशियन (१० जागा) याकरिता जाहिरात देऊन या जागेवर येणाºयांना प्रति महा सव्वादोन लाख रुपये पगारही देऊ केला आहे.      याचबरोबर निवासी (चेस्ट, बी़टी़/ मेडिसीऩडी़एम/भूलतज्ज्ञ) व निवासी पेडियाट्रिशियन या ३० जागांसाठी ८१ हजार २५० रुपए प्रतिमहा पगार देण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान २९ जूनच्या जाहिरातीनुसार सोमवारपासून महापालिकेच्या मुख्य इमारतीत पद भरती प्रक्रिया सुरू झाली असली तरी, यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर किती येतील याबाबत शंका आहे. महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच ५० वैद्यकीय अधिकारी (एम़बी़बी़एस़) व ५० वैद्यकीय अधिकारी (बी़ए़एम़एस़) हवे आहेत. तर तेवढेच निवासी डॉक्टरांचीही गरज असून, २०० स्टाफनर्स यांची आवश्यक आहे.      सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागात ही मुलाखत प्रक्रिया सुरू झाली असता, वैद्यकीय अधिकारी (कोविड -१९ आयुष प्रमाणपत्रधारक) या ९० जागांसाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. परंतु, यापैकी प्रत्यक्षात किती जण या कामी रूजू होणार हे आता कागदपत्रांच्या छाननीनंतर स्पष्ट होणार आहे.     महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़रामचंद्र हंकारे यांनी, महापालिकेने सुधारित जाहिरात दिल्यानंतर पगारवाढ व इतर सुविधा दिल्याने प्रतिसाद चांगला मिळाला असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर तीन दिवसात यामध्ये किती तज्ज्ञ डॉक्टर, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी पदासाठी किती उमेदवार आले व किती पात्र आहे याचे चित्र स्पष्ट होईल व ती रिक्त पदे भरली जातील असेही सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर