शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ४४२ नवीन रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८५ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:01 PM

गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

ठळक मुद्देशहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी केला दहा हजाराचा आकडा पार कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या ५२७ वर

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवार (दि.१६) एका दिवसांत तब्बल ४४२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर एका दिवसांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ६८५ झाली असून, एकूण मृत्यू ५२७ वर जाऊन पोहचले आहेत.गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा शहरी भागा सोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील कमी होताना दिसत नाही. मंगळवारी एकाच दिवसांत १६ व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करतात. परंतु, या परिसरातील नागरिक कंटेन्मेंट झोनचे सर्व नियम धाब्यावर बसवत प्रवास करतात, यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.------

 शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी केला दहा हजाराचा आकडा पारपुणे शहरातील कोरोनाग्रस्ताच्या संख्येने मंगळवारी दहा हजाराचा आकडा पार केला. आज दिवसभरात २९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार १८३ इतकी झाली आहे.मात्र, यापैकी ६ हजार ५९६ कोरोनाग्रस्त कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, यामध्ये आज कोरोनामुक्त झालेले १५० जण आहेत़ दरम्यान आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू शहरात झाला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० इतका होता. आज घेण्यात आलेल्या २ हजार ५४७ स्वॅब टेस्टिंग व कालचे प्रलंबित अहवाल यापैकी आज प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये २९३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे शहराने कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजार पार केला आहे.     सद्यस्थितीला २१३ कोरोनाग्रस्त गंभीर असून, यापैकी ४१ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी शहरात ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९ झाली आहे. -------------एकूण बाधित रूग्ण : १२६८५पुणे शहर : १०३००पिंपरी चिंचवड : १२७४कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ११११

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटल