शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Corona Virus : पान, तंबाखू,गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; ग्रामीण पोलीस 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 21:43 IST

पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश

उरुळी कांचन: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ग्रामीण पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विना मास्क फिरणाऱ्यांवर व पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर आगामी काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले आहेत.

पुणे शहरांप्रमाणेच,ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विना मास्क बाहेर पडणारे अथवा पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यावर दंड आकारणीबरोबरच, कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र काही अपवाद वगळता बहुतांश ग्रामपंचायतींनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यापुढील काळात कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहे.      याबाबत पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पोलिसांना रस्त्यावर उतरण्याच्या सुचना दिल्या आहेत व नियमांचा वारंवार भंग करणाऱ्याच्या विरोधात भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलिस अधिकारी, होमगार्ड अथवा विशेष पोलीस अधिकारीही यापुढील काळात कारवाई करु शकणार आहेत.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस