पुणे : पुण्यामध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून एकाच दिवसात ६३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड अशा तीनही ठिकाणच्या एकूण रुग्णांची संख्या ४३७ वर जाऊन पोचली आहे. तर, दिवसभरात झालेल्या दोन जणांच्या मृत्यूंमुळे मृतांचा आकडा ४३ वर गेला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः शहरातील काही भागात रुग्ण संख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भोर आणि वेल्हा याभागातही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिक्रापूर येथील एका डॉक्टरला कोरोना झाल्यामुळे याभागातील चिंता वाढली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्य अधिकाऱ्यांसह शिक्रापूरमध्ये तळ ठोकून आहेत. यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. बुधवारी (दि.१५) रोजी एकाच दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत तब्बल ६३ ने वाढ झाली. तर बुधवारी दिवसभरात एकूण ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात दिवसभरात ४२८ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात ६३ जणांना कोरोना संक्रमण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत कोरोना आजारामधून पूर्णपणे बरे झालेल्या ४२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, रुग्णालयात ३५४ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत एकूण ४ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर ४ हजार ९५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आतापर्यंत ४ हजार १३९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, अद्याप ५६९ संशयित विलगिकरण कक्षात निगरानीखाली आहेत...................पुण्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या: ४३७पुणे शहर : ३६९पिंपरी चिंचवड: ४२नगरपालिका हद्द : १५पुणे ग्रामीण : ११एकूण मृत्यु : ४३
Corona virus : पुण्यात कोरोनाचा आकडा वाढता वाढता वाढे, एका दिवसात तब्बल ६३ नवीन रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:22 IST
आजपर्यंत पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णांची बळींची संख्या ही ४१ झाली आहे.
Corona virus : पुण्यात कोरोनाचा आकडा वाढता वाढता वाढे, एका दिवसात तब्बल ६३ नवीन रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू
ठळक मुद्देपुणे शहरात सील केलेल्या सर्व भागांमध्ये युध्दपातळीवर प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी आत्तापर्यंत ७९५ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून २५ लाख ७५ हजार ५०१ जणांची तपासणी