शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

Corona Virus : पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ४५९ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ६ हजार १५३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:32 IST

पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

ठळक मुद्देआजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही आता २ हजार ७३५ इतकी

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण वाढीचा वेग प्रचंड झपाट्याने वाढत असल्याने आता स्पष्ट झाले आहे. सोमवारी एकाच दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४५९ नवीन रुग्णांची भर पडली. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आज अखेर जिल्ह्यात आज अखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ हजार १५३ झाली आहे. तर एकूण मृत्यू २८० वर जाऊन पोहचले आहेत. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात कोरोना प्रादुर्भाव सुरूवाती पासूनच अधिक आहे. यामध्ये आता ग्रामीण भागाची भर पडली असून, ग्रामीण भागात देखील सरासरी नव्याने १० ते १५ पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत.कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या जिल्हा प्रशासनासाठी आता डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात सोमवारी नव्याने १४ रुग्णांची भर पडली. तर सर्वाधिक वाढ अर्थातच पुणे शहरामध्ये झाली आहे. ------ 

पुणे महापालिका हद्दीत प्रथमच एकाच दिवसात उच्चांकी ३९९ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. यामुळे पुणे शहराने कोरोनाबाधित रूग्णांचा पाच हजाराचा आकडा पार केला असून, सोमवारपर्यंत शहरात एकूण ५ हजार १८१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी आढळून आलेल्या ३९९ रूग्णांमध्ये बहुतांशी रूग्ण हे कंटन्मेंट भागातीलच आहेत.पुणे शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही मोठे आहे. सोमवारी १७९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही आता २ हजार ७३५ इतकी झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या जरी ५ हजार १८१ इतकी झाली असली तरी, यापैकी अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १८२ इतकी आहे़ यापैकी १७९ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर ४४ रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

...................................................

एकूण बाधित रूग्ण : ६१५३पुणे शहर : ५२४७पिंपरी चिंचवड : ३८३कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ५२३     

बरे झाले : 3195मृत्यु : २८० 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकार