शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ३०५ नवीन बाधित : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५़. ४२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 21:50 IST

पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित

ठळक मुद्देआज १४२ जण कोरोनामुक्त : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५़. ४२ टक्के

पुणे : शहरातील स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्ण वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या नव्या रूग्णांमध्ये आता शहरातील कंटन्मेंट झोनबरोबरच झोन बाहेरील रूग्ण वाढही लक्षणीय असून, शुक्रवारी नव्याने ३०५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये २२२ रूग्ण गंभीर असून, ४९ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३९५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, यापैकी २२५ जण पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व आयसोलेशन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर ससूनमध्ये १५ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६५ रूग्ण दाखल आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या १४२ जणांपैकी १०३ जण हे विविध आयासोलेशन सेंटरमधील असून, खाजगी हॉस्पिटलमधील २६ जण तर ससून हॉस्पिटलमधील १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आजपर्यंत शहरात एकूण कोरोनाबाधितांपैकी ५ हजार ९२४ कोरोनामुक्त झाले असून, ही टक्केवारी ६५.४२ टक्के इतकी आहे.     पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज मृत्यू झालेल्या १२ जणांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ४ जण हे ससून हॉस्पिटलमधील असून,  नवले हॉस्पिटलमधील ४ जणांसह आठ जण हे खाजगी हॉस्पिटलमधील आहेत.     आज दिवसभरात शहरातील २ हजार २४९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, आत्तापर्यंत पुणे महापालिका हद्दतील ६८ हजार ७३६ जणांचे स्वॅब  घेण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या