शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Corona virus : पुणे शहरात २६८ नवीन कोरोनाबाधित; जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १० हजार ८१२ वर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 11:57 IST

शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ

ठळक मुद्देशहरातील ७ हजार ५२२ कोरोना संशयितांना करण्यात आले क्वारंटाईनतीन महिन्यात तब्बल ५ हजार ७८२ रूग्ण पूर्णपणे बरेसद्यस्थितीला शहरात २१६ गंभीर रूग्णांची नोंद पुणे जिल्ह्यात गुरुवारी ४१८ नवीन रुग्ण वाढले ; ११ रुग्णांचा मृत्यू 

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढीची संख्या दररोज वरखाली होत असली तरी, वाढीच्या प्रमाणात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण हे सुखावह आहे. गुरूवारी २६८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २९७ जण कोरानामुक्त होऊन घरी परतले आहेत.     पुणे शहरात गेल्या तीन महिन्यात एकूण ८ हजार ७७७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तसेच या तीन महिन्यात तब्बल ५ हजार ७८२ रूग्ण पूर्णपणे बरेही झालेले आहेत. तर यापैकी ४१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़ आज मृत्यू झालेल्या ७ जणांमध्ये तीन जण हे ससून हॉस्पिटलमध्ये, तीन जण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये तर एक जण औंध उरो रूग्णालयात उपचार घेत होते. सद्यस्थितीला शहरात २१६ गंभीर रूग्णांची नोंद असून, यापैकी ५३ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अ‍ॅक्टिव रूग्णांची संख्या ही २ हजार ५८२ एवढी आहे. यापैकी १९७ जण हे पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, तर ससून हॉस्पिटलमध्ये ७ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६४ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.     शहरातील ७ हजार ५२२ कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर आज नव्याने २ हजार ४३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून, आजपर्यंत ६६ हजार ४८७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.                                     ------------------------------

पुणे जिल्ह्यात गुरुवारी ४१८ नवीन रुग्ण वाढले ; ११ रुग्णांचा मृत्यूपुणे : जिल्ह्यात पुणे शहरासह आता पिंपरी चिंचवड महापालिका, कॅन्टोनमेन्ट आणि ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. गुरुवार (दि. ११ ) रोजी एका दिवसांत जिल्ह्यात ४१८ नवीन रुग्णांची वाढ झाली. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० हजार ८१२वर जाऊन पोहचली आहे. तर कोरोनामुळे आता पर्यंत एकूण ४६० मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता पर्यंत दररोज १० ते २० रुग्ण वाढत होते. परंतु जून महिन्यात गेल्या काही दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुरूवारी पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल ९७ नवीन रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागात १२ व कॅन्टोनमेन्ट हद्दीत १७ नवीन रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण देखील चांगले आहे. परंतु मृत्यू दर कमी करण्यात अपेक्षित यश येताना दिसत नाही. 

------एकूण बाधित रूग्ण : १०८१२पुणे शहर : ८८९३पिंपरी चिंचवड : १०५४ कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ९०४मृत्यु : ४६०

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर राम