Corona Virus : पुणे शहरात रविवारी २६४ तर पिंपरीत १८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 11:40 AM2021-01-11T11:40:46+5:302021-01-11T11:46:17+5:30

पुणे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ६८९

Corona Virus : 264 in pune city and 183 new corona infected patients In n Pimpri on Sunday | Corona Virus : पुणे शहरात रविवारी २६४ तर पिंपरीत १८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण

Corona Virus : पुणे शहरात रविवारी २६४ तर पिंपरीत १८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देपुणे शहरात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार १४३ दिवसभरात दोन जण दगावले : १६३ जण कोरोनामुक्त

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात २६४ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २१४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ६८९ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०८ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, ३०५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ६६७९ झाली आहे. पुण्याबाहेरील २ मृत्यूची नोंद करण्यात आली.

दिवसभरात एकूण २१४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार १४३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ६७९ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९५४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९ लाख ५९ हजार ६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
...  
पिंपरीत नवे १८३ कोरोनाबाधित रुग्ण
पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत असला तरी धोका कायम आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत दररोज भर पडतच आहे. शहरात रविवारी १८३ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७९७३ झाली. तर दिवसभरात १६३ जण कोरोनामुक्त झाले.

शहरात रविवारी कोरोनाचे दोन रुग्ण दगावले. दोन्ही रुग्ण शहराबाहेरील आहेत. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७७२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७३८ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. रविवारी दिवसभरात २५८४ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २०७१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ३४२४ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २५६२ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५७५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७४६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९४४७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ९० रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरातील सक्रिय रुग्णांमध्ये वाढ
कोरोना पॉझिटिव्ह असलेले ५७५ सक्रिय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ११४९ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १७२२ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपेक्षा गृहविलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच शनिवारी शहरातील एकूण सक्रीय रुग्ण १७०२ होते. त्यात रविवारी २० रुग्णांची भर पडून सक्रीय रुग्णसंख्या १७२२ झाली.

Web Title: Corona Virus : 264 in pune city and 183 new corona infected patients In n Pimpri on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.