शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेच्या १७ कोविड योद्ध्यांना २५ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 17:31 IST

महापालिका सेवेतील २७ कोविड योद्ध्यांचा मृत्यू

ठळक मुद्देधोरणात्मक निर्णय घेऊन होतेय अंमलबजावणी

पुणे : कोरोना आपत्तीत कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुणे महापालिकेच्या १७ कोविड योध्यांना लवकरच २५ लाख रुपयांची मदत व वारसास नोकरीची प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.      वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्र शासनाच्या विमा योजनेतून ५० लाखांची विमा रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने, महापौर यांनी पक्षनेत्याच्या बैठकीत महापालिकेने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची तात्काळ मदत देण्याबाबत धोरणांत्मक निर्णय घेतला. याबाबतचे पत्र पालिकेच्या कामगार कल्याण विभागाकडे सोमवारी प्राप्त झाल्याने, त्याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आज आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. ज्या १७ जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, त्या सर्वांच्या नातेवाईकांनी  वारसास नोकरीची मागणी केली आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात त्यांना २५ लाख व वारस नोकरीचे पत्र दिले जाणार आहे. -------केंद्राकडील विमा रक्कम मिळण्याबाबत साशंकता    कोविड योद्धे म्हणून कर्तव्य बजावताना कोरोनामुळे निधन झालेल्या सेवकांचा मृत्यू झाला, अशांना केंद्र शासनाने ५० लाखांचे विमा कवच दिले आहे. या विमा रक्कमेसाठी महापालिकेने ११ जणांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले आहेत. मात्र ते अद्याप मंजूर न झाल्याने ही रक्कम कधी मिळेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.--------महापालिका सेवेतील २७ कोविड योद्ध्यांचा मृत्यू    कोरोना आपत्तीत काम करताना पुणे महापालिका सेवेतील ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी १०१ सेवक कंत्राटी व ४६१ कायमस्वरूपी सेवेतील आहेत. तर यात २५ कायम सेवकांचा व २ कंत्राटी सेवकांचा मृत्यू झाला आहे. ७ सप्टेंबर पर्यंत कोरोनाबधितांपैकी ३३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर १९९ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ज्या २ कंत्राटी सेवकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यांना पालिकेची मदत कामगार कल्याण निधीतून देता येणार नसल्याने, सर्व साधारण सभेची त्यास विशेष मान्यता लागणार आहे.-------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू