Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४१ नवे कोरोनाबाधित, तर २९८ जण कोरोनामुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 07:23 PM2020-11-06T19:23:41+5:302020-11-06T19:25:31+5:30

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३६५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू

Corona virus: 241 new corona infected in Pune on Friday: 298 corona free | Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४१ नवे कोरोनाबाधित, तर २९८ जण कोरोनामुक्त 

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी २४१ नवे कोरोनाबाधित, तर २९८ जण कोरोनामुक्त 

googlenewsNext
ठळक मुद्दे१ लाख ६२ हजार ८८८ जण पॉझिटिव्ह आले असून यातील १ लाख ५३ हजार १३९ जण कोरोनामुक्तशहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४२८ इतकी

पुणे : शहरात शुक्रवारी २४१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, २९८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यामध्ये ४ जण पुण्याबाहेरील आहेत.
    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ३६५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी २३० जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १ हजार १४२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. 
    पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ५० हजार ४१२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ६२ हजार ८८८ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५३ हजार १३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ५ हजार ४२८ इतकी आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरात २ हजार १९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. 
         ----------------------------------

Web Title: Corona virus: 241 new corona infected in Pune on Friday: 298 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.