पुणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या मध्यवस्तीला पालिकेने सील केले असून याभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालिकेने आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याविषयी आदेश काढण्यात येणार आहे. यापूर्वी शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय)सील करण्यात आलेला आहे. शहरातील काही विशिष्ट परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आणखी २२ ठिकाणांवर सील करणे आवश्यक असल्याचे पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:54 IST
जिल्हाधिकारी घेणार निर्णय
Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव
ठळक मुद्देयापूर्वी शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय)सील