शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात २१२ नवीन कोरोनाबाधित; एकूण रूग्णांची संख्या १२ हजार ६८६

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 21:47 IST

आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२

ठळक मुद्देएकूण २५५ रुग्णांना सोडले घरी : २८० रुग्ण अत्यवस्थ, ८ जणांचा मृत्यू

पुणे :  शहरात दिवसभरात २१२ रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १२ हजार ६८६ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २५५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. विविध रुग्णालयातील २८० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ४ हजार ४९६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २१२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४८ तर खासगी रुग्णालयांमध्ये १५९ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २८० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २२५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी ०८ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५१८ झाली आहे. दिवसभरात एकूण २५५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १९५ रुग्ण, ससूनमधील १३ तर  खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ४९६ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २२७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ९० हजार ४०६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ८४० ससून रुग्णालयात ३३१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार ३२५ रुग्ण उपचार घेत आहेत.

..............................................

पिंपरी शहरात ९४ नवे रुग्ण , ११ जण झाले कोरोनामुक्त

 दिवसभरात रुग्णालयात १६३ संशयित रुग्ण दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून सोमवारी दिवसभरात ९४ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच महापालिका हद्दीबाहेरील चार रुग्णांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८६३ वर गेली आहे. तर ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १६३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका हद्दीबाहेरील दोघांचा समावेश आहे. मृतांची संख्या ५७ वर पोहोचली असून यात महापालिका हद्दीबाहेरील २४ जणांचा समावेश आहे

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड