शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Corona virus : पुण्यात पोलिसांकडून २ लाख १० हजार 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'; उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये वाढले पेशंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 9:18 PM

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पोलिसांकडून महापालिकेला संभाव्य बाधितांचा शोध घेण्यास मदत केली जात आहे.

पुणे : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना त्यांच्यापासून संभाव्य बाधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न शहर पोलीस दलाच्या पथकांकडून केला जात असून आतापर्यंत तब्बल २ लाख १० हजार १५७ संभाव्य बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पोलिसांकडून महापालिकेला संभाव्य बाधितांचा शोध घेण्यास मदत केली जात आहे.याबाबत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले की, महापालिकेच्या मदतीसाठी पुणेपोलिसांचा एक स्वतंत्र तांत्रिक विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून पुढील काळात कोणत्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढू शकते, कोणत्या भागात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, याची माहिती पुरविण्यात येते. आता शहरातील सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. पोलिसांना उपलब्ध झालेल्या मोबाईल क्रमांकावरुन या बाधितांनी कोणाकोणापर्यंत संसर्ग पसरविला असण्याची शक्यता आहे, त्यांची माहिती दिली जाते.

सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, सहायक निरीक्षक सुनिल गवळी व त्यांची २० जणांची टीम विश्लेषणाचे काम करीत असते. त्यानुसार २७ मे ते ९ सप्टेंबर दरम्यान उपलब्ध झालेल्या मोबाईलक्रमांकानुसार तब्बल १ लाख २ हजार ७८० बाधितांचे विश्लेषण करण्यात आले.त्यात लक्षणे असलेले ७६ हजार ८१४ जण होते. त्याचवेळी २५ हजार ९६६ जणांमध्ये लक्षणे दिसून आली नाही. 

१८ हजार गृहिणीशहरात कोरोना बाधित झालेल्यांपैकी पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात घरातून केवळ भाजीपाला व अन्य साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडणाºया १८ हजार ५३ गृहिणी बाधित झाल्याचे आढळून आले आहे.

२ हजार ३११ वैद्यकीय क्षेत्रातीलशहरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांमध्येही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळून आले आहे. तब्बल २ हजार ३११ डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाºयांना बाधा झाली आहे. 

२ हजार ४४१ उच्चभ्रु सोसायट्यासुरुवातीच्या काळात झोपडपट्टी भागात प्रामुख्याने कोरोना फैलाव झाल्याचे दिसून आले होते. आता तो उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये पसरला आहे. शहरातील किमान २ हजार ४४१ उच्चभ्रु सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

पेठांमध्ये वाढतोय संसर्गशहरातील पेठ्या, ताडीवाला रोड हे भाग कोरोनामुक्त झाले होते.पण आताच्या पाहणीत या भागात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा दिसून आले असून तो एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या