शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

Corona virus : पुणे शहरात १८४ रुग्ण बरे होऊन गेले घरी; दिवसभरात १०६ रूग्णांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 21:17 IST

शहरात तब्बल १७१ रुग्ण अत्यवस्थ तर ११ रूग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देएकूण रुग्णसंख्या ५ हजार ५३३ ; आजारातून बरे झालेल्यांची संख्या ३ हजार ५९

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये १०६ रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ५३३ झाली आहे. बरे झालेल्या १८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार १९० आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७१ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ४१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५७ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी ११ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २८४ झाली आहे. दिवसभरात एकूण १८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १०८ रुग्ण, ससूनमधील १० तर  खासगी रुग्णालयांमधील ६६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ५९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार १९० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३६० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४५ हजार २६७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५३६, ससून रुग्णालयात १४६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्त