पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये ८७ रूग्णांची भर बुधवारी पडली असून आतापर्यंतचे सर्वाधिक १६८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ८२४ झाली असून प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण १२८४ आहेत. दिवसभरात एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ११५ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री साडेआठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडू रुग्णालयात ५५ तर खासगी रुग्णालयांमध्ये २२ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ८३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी सात मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६३ झाली आहे. दिवसभरात एकूण १६८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी असून यामध्ये नायडू रुग्णालयातील १५० रुग्ण, ससूनमधील ०४ तर खासगी रुग्णालयांमधील १४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १३७७ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार २८४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२०५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ हजार ९५३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९०६, ससून रुग्णालयात १०८ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २७० रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरामध्ये एकाच दिवसात १६८ रुग्ण झाले कोरोनामुक्त, नव्या ८७ रूग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 21:20 IST
शहरात रूग्णांची एकूण संख्या झाली २ हजार ८२४
Corona virus : पुणे शहरामध्ये एकाच दिवसात १६८ रुग्ण झाले कोरोनामुक्त, नव्या ८७ रूग्णांची भर
ठळक मुद्दे दिवसभर सात रुग्णांचा मृत्यू, एकूण एक्टिव्ह रुग्ण १२८४दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १२०५ नागरिकांची स्वाब तपासणी