शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १६४ नवीन रूग्णांची वाढ ; जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १३४

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:59 IST

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १०७ रुग्ण अत्यवस्थ

ठळक मुद्देशहरातील १६४ कोरोनाग्रस्त रूग्णांची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढले तब्बल १२० जण झाले ठणठणीत बरे

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवार (दि.१२ ) रोजी एकाच दिवशी दीडशे पेक्षा अधिक म्हणजे १५६ तर शहरात १६४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. तर ७ रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार १३४ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांच्या तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. मंगळवारी ८९६ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५६ संशयित पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तर ७ रूग्णांचा मृत्यू झाला.पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये मंगळवारी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली असून दिवसभरात तब्बल १६४ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ७३७ झाली आहे. यासोबतच दिवसभरात तब्बल १२० रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १०७ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १६४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १२, नायडू रुग्णालयात १३५ तर खासगी रुग्णालयांमध्ये १७ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ८२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात मंगळवारी सात मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५६ झाली आहे. दिवसभरात एकूण १२० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ६९ रुग्ण, ससूनमधील ७  तर  खासगी रुग्णालयांमधील ४४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १२०९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३७२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ९८९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २४ हजार ७४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९८८, ससून रुग्णालयात १०६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २७८ रुग्ण उपचार घेत आहेत.............पुणे शहर : २७६९पिंपरी चिंचवड : १७३कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : २३६मृत्यु : १६८घरी सोडलेले : १३५८.एकूण बाधित रूग्ण : ३१३४

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर राम