शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे विभागातील १३ हजार ९१७ रुग्ण कोरोनामुक्त,९५९ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:35 IST

पुणे विभागातील एकूण कोरोनाबधितांची संख्या २३हजार १५९ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देआजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 56 हजार 476 नमुने पाठवले तपासणीला

पुणेपुणे विभागातील १३ हजार ९१७  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून, विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २३ हजार १५९  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ही ८ हजार २८३ इतकी आहे. 

      विभागात कोरोनाबाधीत एकुण ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४६३ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.०९ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण ४.१४ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. सदर आकडेवारी २६ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे.

     विभागात पुणे जिल्हयातील १८ हजार ८४० बाधित रुग्ण असून कोरोना बाधित १० हजार ८८९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७ हजार २९४ आहे. तर जिल्यातील एकूण ६५७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला ३७३ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५७.८० टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण ३.४९ टक्के इतके आहे.

गुरुवारच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण १ हजार ११० ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ९३५ , सातारा जिल्ह्यात २४,  सोलापूर जिल्ह्यात १३१, सांगली जिल्ह्यात ७ तर कोल्हापूर जिल्ह्यात १३ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

  आजपर्यत विभागामध्ये एकुण १ लाख ५६ हजार ४७६ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी १ लाख ५५ हजार ४० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १ हजार ४३६ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १ लाख ३१ हजार ५५४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून, २३  हजार १५९ नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

             -----------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त