शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

Corona Virus : धक्कादायक! पुणे शहरातलं १ रुग्णालय, ४४ दिवस अन् १०० मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 16:43 IST

अधिकारी बदलले, स्थिती जैसे थे

ठळक मुद्देकोरोनासह मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह अन्य आजार असलेल्या रुग्णांचे मृतांमध्ये अधिक प्रमाण

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा शनिवार (दि. १५) पर्यंत पावणे दोनशेच्या पुढे गेला असून एकट्या 'त्या ' रुग्णालयातील मृत्यूने शंभरी गाठली आहे. केवळ ४५ दिवसांतच २ ते ३ मृत्यूच्या सरासरीने रुग्णालयामधील मृत्युचे सत्र सुरूच आहे. सुरूवातीच्या काळात अचानक वाढलेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे अधिष्ठातांच्या बदलीसह टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला होता. पण रुग्ण वाढत गेल्याने मृत्युचे प्रमाण कमी होऊ शकले नाही.  

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर या रुग्णांमध्ये काही दिवसांतच वेगाने वाढ सुरू झाली. त्यामुळे नायडू रुग्णालयानंतर 'ससून' रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करण्यास सुरूवात झाली. प्रामुख्याने अत्यवस्थ रुग्णांना ससूनमध्ये दाखल करण्यात येत होते. दि. १ एप्रिलला रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूचे सत्र सुरू झाले. त्यानंतर दररोज २ ते ३ याप्रमाणे मृत्यू होतच राहिले.

त्यामुळे केवळ १४ दिवसांतच ३५ जणांचा मृत्यू झाला. परिणामी, शहरातील मृत्यूदर देशात सर्वाधिक ठरला. या स्थितीमुळे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे तात्पुरता भार सोपविण्यात आला. त्यानंतरच्या पुढील १५ दिवसांत मृतांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. दि. १६ ते ३० एप्रिलदरम्यान २६ जणांचा मृत्यु झाला.  लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढल्याने मृत्युचा वेगही वाढला. दि. १ ते १६ मे या कालावधी सर्वाधिक ४० मृत्यू झाले. शनिवारी दुपारपर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याने ससून मधील एकुण मृतांचा आकडा शंभरीपार गेला. रुग्णालयामध्ये सध्या प्राधान्याने गंभीर स्थितीतील रुग्णांनाच दाखल केले जात आहे. तसेच काही दिवसांपुर्वी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गासह मधुमेह, उच्च रक्तदाब यांसह अन्य आजार असलेल्या रुग्णांचे मृतांमध्ये अधिक प्रमाण आहे. सध्याही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकुण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांना अन्य कोणता ना कोणता आजार आहे. त्यामुळे येथील मृत्युचे प्रमाण अधिक आहे.  
----------  अधिकारी बदलले, स्थिती जैसे थेदेशात सर्वाधिक मृत्युदर पुण्यात असल्याचे समोर आल्यानंतर ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली. तर उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे अधिष्ठाता बनले. शहरातील मृत्यू रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली. ससून रुग्णालयासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्यात आले. पण त्यानंतर एक महिनाभरात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकारी बदलूनही मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. आता दोन दिवसांपुर्वी डॉ. म्हैसेकर यांच्याकडील पदभार काढून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. -------------                                                                                                                                                                                   ससून रुग्णालयाची स्थिती  दिवस                 मृत्यूदि. २ एप्रिल          ०१ दि. १५ एप्रिल        ३५  दि. ३० एप्रिल        ६१   दि. १६ मे             १०१---------------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस