Corona Vaccine Pune : पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा मोठा गोंधळ, नागरिकांच्या नशिबी मनस्ताप एके मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:09 PM2021-04-30T21:09:33+5:302021-04-30T21:11:22+5:30

शुक्रवारी केवळ १० हजार लसींचाच पुरवठा : अनेक केंद्रावरून नागरिकांना फरावे लागते माघारी

Corona Vaccine Pune: Big confusion between corona vaccination in Pune district ,The citizens is very panic | Corona Vaccine Pune : पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा मोठा गोंधळ, नागरिकांच्या नशिबी मनस्ताप एके मनस्ताप

Corona Vaccine Pune : पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा मोठा गोंधळ, नागरिकांच्या नशिबी मनस्ताप एके मनस्ताप

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ७६ हजार ७०४

पुणे : जिल्ह्यात लसीकरण माेहिम वेगात असतानाच योग्य प्रमाणात लस पुरवठा होत नसल्याने याचा परिणाम या लसीकरण मोहिमेवर होत आहे. ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५० वर्षांवरील अनेकांनी पहिला डोस घेतला. मात्र, लसीचा पुरवठा कमी होत असल्याने त्यांना दुसरा डोस घेण्यास अडचणी येत आहेत.  त्यात १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार असल्याने हे लसीकरण कसे होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंन्ट लाईल वर्कर यांना लसीकरण करण्यात आले तर. तर दुसऱ्या टप्यात ६० वर्षांपुढील जेष्ठ नागरिक तसेच  ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड ही लस देण्यात आली. सुरवातीला या लसीसा पुरवठा राज्याकडून योग्य प्रमाणात झाला. मात्र, लसीकरणाचा वेग वाढल्याने जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. जिल्ह्यातील ४७ हजार ८९७ हेल्थ केअर वर्कर्सला पहिला डोस देण्याता आल तर३७ हजार ५१३ जणांनी दुसरा डोस घेतला. तर ८१ हजार ८३ फ्रंन्ट लाईन वर्कर्सनी पहिला तर २६ हजार ७६४ दुसरा डोस घेतला.  

जिल्ह्यात ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ७६ हजार ७०४ ऐवढी आहे. यातील ३ काझ५६ हजार ७९० लाभार्थ्यांनी पहिला तर३७ हजार ५१३ जणांणी केवळ दुसरा डोस घेतला आहे. अद्याप दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ४५- ते ५९ वर्षाच्या नागरिकांचीही हीच अवस्था आहे. ३ लाख ३६ हजार९३ नागरीकांनी ही लस घेतली. तर केवळ १८ हजार ४३५जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात रोज पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी होत असल्याने प्राधान्यांने दुसरा डोस देण्याची मागणी होत आहे.  

जिल्ह्याला बुधवारी ४० हजार लसी प्राप्त झाल्या. दोन दिवस हे लसीकरण चालले. मात्र, शुक्रवारी केवळ १० हजार लसी जिल्ह्यासाठी मिळाल्याची माहिती आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. त्यात शासनाने १८ वर्षांवरील प्रत्येकाला लसीकरण सुरू केल्यामुळे दुसरा डोस मिळणार की नाही ही परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात लसींचा पुरवठा कमी होत असल्यानमुळे  लसीकरणाचा वेग हा मंदवण्याची शक्यता आहे. 

... 

अठ्ठावीस दिवसांत दुसरा डोस न घेतल्यास पहिल्या डाेसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता

कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारक्षमता तयार होण्यासाठी दोन लसींचा डोस घ्यावा लागतो. पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस हा २८ दिवसांनंतर घेणे बंधन कारक आहे. या दिवसांत लस न घेतल्यास पहिल्या डोसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी होत असल्याने लस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळणार की नाही या संभ्रमात नागरिक आहेत.

Web Title: Corona Vaccine Pune: Big confusion between corona vaccination in Pune district ,The citizens is very panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.