शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : पुणे शहरात पंधरा ठिकाणी कोरोना लसीकरण; महापालिकेकडून आवश्यक तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 20:32 IST

पुणे शहरातही १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोनावरील लस देण्यात येणार

ठळक मुद्देडोस उपलब्धतेवर नियोजन अवलंबून 

पुणे : केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पुणे शहरातही १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. याकरिता पुणे महापालिकेने १५ ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीला प्रत्यक्षात किती जणांना लस दिली जाईल हे महापालिकेकडे उपलब्ध होणाऱ्या लसवर अवलंबून आहे.  

पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंतची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. सर्व टप्प्यातील लसीकरणासाठी शहरात साधारणत: २ हजार ९७ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत. याव्दारे शहरातील सुमारे ४० लाख ३९ हजार ५९९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

१६ जानेवारी रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयनिहाय लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, याकरिता खाजगी, महापालिकेची रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे़ ९९ बूथव्दारे होणाऱ्या या लसीकरणात एका दिवशी एका बूथवर शंभर जणांना लस दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस दिली जाणार असल्याने, महापालिकेकडे नोंद केलेल्या ५२ हजार ७०२ जणांना आठ दिवसात लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यात महापालिकेतील ११ हजार ७४ आरोग्य सेवक तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील ४१ हजार ६२८ जणांची नोंदणी झाली आहे़ या सर्व जणांना लस दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याने वेस्टेज १० टक्के अधिकचा आकडा धरून महापालिकेला १ लाख १५ हजार ८२५ लसीचे डोसची आवश्यकता आहे.    --------------------------------गरज पडली तर जम्बो हॉस्पिटलपुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयनिहाय १५ ठिकाणी लसीकरणची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचे नियोजन हे पूर्णत: किती प्रमाणात लस उपलब्ध होते यावर अवलंबून आहे. त्यामुळे लसीची मुलबक उपलब्धता झाल्यास, लसीकरणासाठी गरज पडल्यास शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलचाही वापर केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. --------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका