शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : पुणे जिल्ह्यात सहा महिन्यांत केवळ 11 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:48 IST

पहिला डोस घेतलेले 42 टक्के लोक ; लस उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरणाला वेग 

पुणे : राज्यासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली, पण सहा महिन्यांत जिल्ह्यातील केवळ 11 टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण म्हणजे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. तर 42 टक्के लोकांनी पहिला डोस झेतला आहे.  दरम्यान केंद्र शासनाने आता पुरेशा प्रमाणात लसची डोस उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले असून,  जिल्ह्यात दिवसाला दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 

जिल्ह्यात 15 जानेवारीनंतर कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला धीम्या गतीनं झालेल्या लसीकरण मोहिमेला फेब्रुवारी महिन्यात चांगला वेग आला होता. पुणे जिल्ह्यात दिवसाला 50-55 हजार लोकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड देखील केले. परंतू केंद्र शासनाने 18 ते 45 वयोगटातील सरसकट नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि मागणी वाढल्याने लसीच्या डोसेसचा तुटवडा निर्माण झाला. लस उपलब्ध होत नसल्याने पुणे शहरामध्ये काही दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ देखील प्रशासनावर आली. परंतु सध्या अत्यंत धीम्या गतीने लसीकरण सुरू असून, केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्याच्या प्रतिक्षेत प्रशासन आहे. 

जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी,  फ्रंटलाइन वर्कर्स ज्येष्ठ नागरिक यांचे देखील लसीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. तर 18 ते 44 दरम्यान केवळ 22 हजार 88 म्हणजे एक टक्का लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. -------- जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी एकूण अपेक्षित लाभार्थी  : 57 लाख 75 हजार 426 - पहिला डोस घेतलेले नागरिक  : 24 लाख 53 हजार 456 (42 %)- दूसरा डोस घेतलेले नागरिक  : 6 लाख 55 हजार 606 ( 11 टक्के ) -------18 ते 44 वयोगटातील केवळ एक टक्का लोकांचे लसीकरण केंद्र शासनाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण सुरू केले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे 25 लाख 35  हजार 426 लाभार्थी अपेक्षित आहेत. यापैकी 4 लाख 16 हजार 765 लोकांनी पहिला तर दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या केवळ 22 हजार 88 म्हणजे एक टक्का ऐवढी आहे. -------

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तAjit Pawarअजित पवार