शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: पुणे जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 20:05 IST

जिल्ह्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन कवच कुंडल (mission kavach kundal) अभियान हाती घेतले आहे

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत जिल्ह्यात सात ठिकाणी सोमवार ते गुरुवार दरम्यान दिवस-रात्र सलग 75 तास कोरोना लसीकरण सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला हा उपक्रम खरच सुरू आहे का हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सोमवारी मध्यरात्री काही लसीकरण केंद्रांना अचानक भेट दिली.

जिल्ह्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन कवच कुंडल अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण मोहिम सुरू आहे. यामध्ये बारामती, दौंड,  हवेली, खेड आणि मुळशी तालुक्यात हे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. दिवसभर काम करणारे कामगार, नोकरदार लोकांना रात्रीच्या लसीकरणाचा लाभ होतो. 'मिशन कवच कुंडल' कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले. ही मोहीम जोरदारपणे सुरु आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी आपल्या टीमसह वाघोली केंद्राला भेट दिली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  भगवान पवार आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये या विशेष मोहिमेमध्ये मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात या 7 ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण बारामती : महिला रुग्णालय, दौंड : उपजिल्हा रुग्णालय,  हवेली :  प्रा. आ. केंद्र लोणीकाळभोर, प्रा.आ. केंद्र खडकवासला, प्रा.आ. केंद्र वाघोली , खेड : ग्रामीण रुग्णालय चाकण, मुळशी :  उपकेंद्र हिंजवडी

शंभर टक्के लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट सध्या राज्यात सर्वाधिक लसीकरण पुणे जिल्ह्यात झाले असले तरी, येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील शंभर टक्के पात्र लाभारथ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून "मिशन कवच कुंडल " अभियान हाती घेण्यात आले आहे. यासाठी गाव आणि नगरपालिका स्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रशासना सोबतच लोकप्रतिनिधी आणि खाजगी संस्थांना बरोबर घेऊन ही अभियान राबविण्यात येत आहे.- डाॅ.राजेश देशमुख,  जिल्हाधिकारी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्या