Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी १६० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 21:14 IST2021-09-07T21:14:36+5:302021-09-07T21:14:42+5:30

लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Corona Vaccination: 160 Covishield vaccines will be available at 185 centers of Pune Municipal Corporation. | Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी १६० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार 

Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी १६० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असणार 

पुणे : पुणे महापालिकेच्या १८५ लसीकरण केंद्रावर आज बुधवारी (दि. ८) प्रत्येकी १६० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ११ दवाखान्यात प्रत्येकी १४० कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.

लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१५ जूनपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. 
    लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: Corona Vaccination: 160 Covishield vaccines will be available at 185 centers of Pune Municipal Corporation.