शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

"कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 20:31 IST

Neelam Gorhe : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला

आळंदी - आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे अभिन्न अंग आसून शेकडो वर्ष पंढरीच्या वारीचे लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र कोरोना महामारीमुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. आज संतशिरोमणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी अशी प्रार्थना माऊली चरणी  केली. 

महाराष्ट्रातील तमाम जनता अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार हा देखील विठ्ठल भक्त आहे आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात असे संगितले. तसेच अन्नदानासाठी देणगी डॉ.गोऱ्हे यांनी दिली. तसेच मंदिर परिसरातील ज्याप्रमाणे सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या. 

सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रार्दुभाव वाढला होता त्यावेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत असून उत्तम सरकार चालवत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यामुळे विरोध काय टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोत आणि टिकेला महत्त्व देत नाही. 

या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे सीईओ अंकुश जाधव,आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई, सोहळा प्रमुख विकास ढगे, माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, नगरसेविका शैला अविनाश तापकिर, शहरप्रमुख अविनाश तापकिर, विजयताई शिंदे, मंगलताई सोनवणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पोलिस निरीक्षक मोहन यादव, उपनिरीक्षक जोंधळे, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :AlandiआळंदीNeelam gorheनीलम गो-हेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र