शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Lockdown: लाॅकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत 20-30 टक्क्यांनी घट; दूध उत्पादक शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:39 IST

शासनाने घेतलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघ अडचणीत आले आहेत.

पुणे : राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन लागू केला आहे. गेल्या २०-२५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या या लाॅकडाऊनचा राज्यातील दूध व्यवसायाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या राज्य शासनाच्या निर्बंधांमुळे मोठ्या प्रमाणात दूध खरेदी करणारी हॉटेल, चहाची दुकाने, खाणावळी बंद असल्याने रोजच्या दुधाच्या मागणीत जवळपास २० ते ३० टक्के घट झाली आहे.गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने देशव्यापी टाळेबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मात्र हॉटेलांवर क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश असे काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मार्चपासून पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली.त्यात हॉटेल बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरू करण्यात आली. या सगळ्याचा फटका दैनंदिन दूध विक्रीवर झाला आहे. दुधाच्या संकलनाचे प्रमाण कायम आहे, दुधाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याने दुधाच्या वितरणावर काही परिणाम झालेला नाही. मात्र, विक्री घटली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

याबाबत कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले की, राज्यात दुधाच्या विक्रीत घट झाली आहे. कात्रजचे रोजचे दुधाचे संकलन २.५६ लाख लीटर आहे. त्यापैकी सुमारे दीड लाख लीटर दूध शिल्लक राहते. शिल्लक राहिलेले दूध सध्या खाजगी दूध कंपनीला द्यावे लागत आहे. हॉटेल, चहाची दुकाने,आइसक्रीम उत्पादक हे दूध खरेदी करणारे प्रमुख उद्योग करोनामुळे अनियमित पद्धतीने सुरू आहेत.

किरकोळ विक्रीची दुकाने के वळ ७ ते ११ या वेळेतच सुरू असल्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांकडून येणारी मागणी बंद झाली. शिवाय हॉटेल, कंपन्यांची उपाहारगृहे, रस्त्यावरील चहाची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे एकूण २० ते ३० टक्के विक्री कमी झाली आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर दूध विक्री विस्कळीत झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान दुधाची मागणी पूर्ववत झाली. मात्र आता मार्चपासून पुन्हा दुधाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दुधाची विक्री जवळपास ३० टक्के कमी झाली असल्याने सुमारे लिटर मागे पाच रुपयांनी दुधाचे कमी रेट शेतकऱ्यांना द्यावे लागत असून दूध संघाच्या वतीने सरकारला पत्र लिहून विनंती केलेली आहे, शिल्लक राहिलेले दूध सरकारने विकत घ्यावे अन्यथा शेतकऱ्याला लिटर माघे ५ रुपयांचे अनुदान अन्यथा दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडेल असे हिंगे यांनी स्पष्ट केले. -------शासनाने तातडीने अनुदान द्यावे शासनाने घेतलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघ अडचणीत आले आहेत. दुधाची मागणी ३० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. यामुळे दररोज लाखो लिटर दूध शिल्लक राहते. यामुळेच शासनाने शिल्लक राहिलेले दूध विकत घ्यावे अन्यथा शेतकऱ्याला लिटर माघे ५ रुपयांचे अनुदान द्यावे. - विष्णू हिंगे, अध्यक्ष कात्रज दूध संघ

टॅग्स :Puneपुणेmilkदूधbusinessव्यवसायFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या