शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सौम्य स्वरूपाचा, मात्र श्वसन आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ, आरोग्य यंत्रणांनी तयारीत कसूर न करता काम करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:13 IST

सध्याच्या कोरोना विषाणू सौम्य प्रकाराचा असून असून, ताप, खोकला व घशातील खवखव अशी सौम्य लक्षणे आढळून येत आहेत

पुणे: देशातील काही भागांमध्ये सौम्य स्वरूपाच्या कोविड-१९ व इतर श्वसन आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये सध्या कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी तयारीत कसूर न करता काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवांचे आयुक्त विरेंद्र सिंह यांनी याबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या ओमिक्रॉन प्रकारातील जेएन १, एक्सएफजी आणि एलएफ ७.९ या सौम्य प्रकारांचा प्रसार होत असून, ताप, खोकला व घशातील खवखव अशी सौम्य लक्षणे आढळत आहेत. देशभरात २८ मे २०२५ पर्यंत १६२१ सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी ९० टक्के रुग्ण हे केवळ ६ राज्यांमध्ये आहेत. राज्यात सोमवारपर्यंत सुमारे ५०७ सक्रिय रुग्ण असून, बहुतांश रुग्ण मुंबईमध्ये आहेत. वाढत्या कोविड रुग्णांच्या अनुषंगाने राज्य व स्थानिक यंत्रणांना आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य यंत्रणेच्या सज्जता तपासा

सर्व रुग्णालयांतील तयारीची तपासणी करणे. आवश्यक औषधे, पीपीई कीट, ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता तपासून मॉकड्रील घेणे आदीचा समावेश आहे. श्वसन आजारांची चाचणी व देखरेख करणे. ‘सारी’ व ‘इन्फ्लूएंझा’ सारख्या प्रकरणांमधील काही नमुने चाचणीसाठी पाठवणे व पॉझिटिव्ह नमुन्यांची जीनोमिक सिक्वेन्सिंग करणे. रुग्णसंख्या व ट्रेंडवर लक्ष ठेवणे. ‘सारी’ व ‘इन्फ्लूएंझा’ प्रकरणांचे परीक्षण एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम व एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्मच्या पोर्टलवर नियमित माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.

जनजागृती मोहिमा राबविण्यावर भर द्या

व्यक्तिगत स्वच्छता, खोकण्याचे शिष्टाचार, मास्कचा वापर आणि गर्दी टाळण्यासंबंधी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. वृद्ध, सहव्याधी असलेल्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, श्वसन समस्यांची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलSenior Citizenज्येष्ठ नागरिक