शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तपासण्या वाढल्या म्हणून बाधित सापडत आहेत, घाबरू नका : जिल्हाधिकारी नवल किशोर राम:

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 19:54 IST

पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे ही चिंतेची बाब

ठळक मुद्दे पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने  प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय

पुणे: शहरात आरोग्य चाचण्या (टेस्ट) करण्याची संख्या वाढवल्याने कोरोना बाधित रूग्ण सापडत आहे. त्यामुळे एकूण संख्येत वाढ होत आहे, मात्र बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.ते म्हणाले,पूर्व भागात आरोग्य तपासणी करण्याची संख्या वाढवली आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला रूग्णही सापडत आहेत. आजार लपवण्याची किंवा अंगावर काढण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याने हे होत आहे. कोणीही रूग्ण तपासणीविना राहू नये, त्याच्यापासून कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून बाधित सापडत असल्याने प्रशासनाचा हेतू साध्य होत आहे. पण संख्या वाढत असल्याने नागरिक घाबरत असून त्याची चर्चा सुरू असल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, चाचणीसाठी आलेल्या सरकारी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना खरी माहिती द्यावी, सहकार्य करावे.नवलकिशोर राम म्हणाले, नागरिकांंनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच प्रशासन कडक धोरण राबवत आहे.पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका.पुण्यासाठी हा कठीण काळ आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या. वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका.  सर्दी,ताप,खोकला,थकावट व भूक लागत नसेल तर तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवा.आजार अंगावर काढू नका किंवा लपून ठेऊ नका. वेळेवर उपचार मिळाले,तर रुग्ण बरे होतात,असे आवाहनही त्यांनी केले आहे.   पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने  प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.भाजीपाला देखील कांही दिवस नागरिकांना मिळणार नाही.    तसेच उद्योजकांनी कामगारांची  व्यवस्था तेथेच करावी.त्यांना अजिबात बाहेर जाता येणार  नाही.त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.   शेतक?्यांना आवाहन करताना ते म्हणाले,शेतक?्यांनी सुध्दा काळजीपूर्वक शेतीची कामे करावीत. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण झाली.बिनधास्त राहू नका.काळजी घ्या,असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर राम