जिल्ह्याच्या महसुलाला कोरोनाचा फटका; नऊ महिन्यांत १६ टक्केच महसुल जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:37 IST2020-12-17T04:37:55+5:302020-12-17T04:37:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने पुणे जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षांत ५९० कोटी रुपये महसुल गोळा करण्याचे उद्दिष्ट ...

जिल्ह्याच्या महसुलाला कोरोनाचा फटका; नऊ महिन्यांत १६ टक्केच महसुल जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने पुणे जिल्ह्यासाठी चालू आर्थिक वर्षांत ५९० कोटी रुपये महसुल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु कोरोना आणि नैसर्गिक संकटांमुळे मोठा फटका बसला आहे. गेल्या नऊ-दहा महिन्यात जिल्ह्यात केवळ १६-१७ टक्केच म्हणजे १२७ कोटी रुपयांचा महसुल जमा झाला. पुढील तीन महिन्यांत साडेचारशे कोटी वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
सन २०-२१ हे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच जगावर कोरोनाचे संकट आले. यामुळे यात पुणे जिल्ह्यासाठी सन २०-२१ या आर्थिक वर्षात सुमारे ५९० कोटी रुपयांचा महसुल जमा करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात अडचणी येत आहेत. गौण खनिज व उत्खननातून २४७ कोटी तर अन्य जमीन महसुलातून ३४३ कोटी रुपये वसूल करणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ‘एनजीटी’च्या विविध निर्बंधांमुळे जिल्ह्यात वाळू लिलाव झाले नाहीत. सध्या केवळ अनधिकृत वाळू उपसा व बेकायदेशीर वाळू वाहतुकीवरील कारवाईतून ७१ कोटी २३ लाख वसूल करण्यात आले. तर अन्य जमीन महसुलाचे ५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. आता पुढील तीन महिन्यांत जास्तीत जास्त महसुल जमा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत.