शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी आयोगाकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांची प्रत मिळावी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 20:51 IST

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे जमा होणारी कागदपत्रांची पत्र खटल्याचा कामकाजासाठी मिळावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यतायेत्या ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया केली जाणार

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे जमा होणारी कागदपत्रांची पत्र खटल्याचा कामकाजासाठी मिळावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. आयोगाच्या कामकाजाला बुधवारी सुरुवात झाली आहे. आयोगाकडून येत्या ६ आॅक्टोबरपर्यंत १७ व्यक्तींची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, त्यास जास्त अवधी लागत असल्याने या कामकाजास मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत जमा होणारी कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी हर्षाली विनायक पोतदार यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी अ‍ॅड. रोहन नहार यांच्यामार्फत आयोगाकडे मागणी अर्ज केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रमामपत्रे, याप्रकरणात दाखल झालेल्या प्रकरणांची सध्यस्थिती काय आहे याचे कागदपत्रे, दोषारोपपत्र, एफआयआर, पंचनाम्याची कॉपी, फोटो आणि व्हिडीओची सॉफ्ट कॉपी, शुक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली केस डायरी, वायरलेसद्वारे मिळालेले मॅसेज, २८ डिसेंबर २०१७ ते ३ जानेवारी २०१८ दरम्यान शिक्रापूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या चौकींमध्ये खबरदारीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, याकाळात एसआयटीने दिलेला रिपोर्टची प्रत द्यावी, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.  कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या द्विसदस्यीय आयोग कोरेगाव भिमा प्रकरणी चौकशी करीत आहे.  

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCourtन्यायालयPoliceपोलिस