‘कोप’अ‍ॅप ग्रामीणमध्ये नॉट रिचेबल

By Admin | Updated: February 3, 2017 04:00 IST2017-02-03T04:00:22+5:302017-02-03T04:00:22+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणा-या उमेदवारांवर वॉच ठेवण्यासाठी खास स्वतंत्र ‘कॉप’ (सिटीझन आॅन पोर्टल) तयार केले आहे.

'Cope' app is not Reachable in the countryside | ‘कोप’अ‍ॅप ग्रामीणमध्ये नॉट रिचेबल

‘कोप’अ‍ॅप ग्रामीणमध्ये नॉट रिचेबल

पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणा-या उमेदवारांवर वॉच ठेवण्यासाठी खास स्वतंत्र ‘कॉप’ (सिटीझन आॅन पोर्टल) तयार केले आहे. निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिक थेट या अ‍ॅपवर तक्ररारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा नसल्याने व तक्रार आल्यानंतर त्वरीत पथक पाठविणे शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने हे अ‍ॅप मागे घेतले आहे.
या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकतात आणि गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवू शकतात. यामध्ये पैसे, भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप मद्ये वाटप, प्राण्यांचा वापर, लहान मुलांचा वापर, भुमी पुजन, उद्घाटन समारंभ, ध्वनीक्षेपण गैरवापर, प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वास्तव करणे, मतदानाचे दिवशी वाहनांचा वापर याप्रकारच्या तक्रारी निवडणूक आयोगाला पाठविता येणार होत्या. अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार आल्यानंतर त्या निवडणूक क्षेत्रातील पथक त्वरीत जाऊन कारवाई करणार होते. परंतु सध्या जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये आजही नेटची सुविधा नाही. तसेच जिल्ह्यातील क्षेत्रांचा विचार करता तक्रार आल्यानंतर एखाद्या पथकाला त्वरीत त्या ठिकाणी पोहचणे देखील कठीण आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी हे अ‍ॅप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: 'Cope' app is not Reachable in the countryside