शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करणे गरजेचे : नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 18:39 IST

पिण्याच्या पाणासाठी आवश्यकतेनुसार टँकर भरण्याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्यात यावा. जिल्हयात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत ..

पुणे : लघुसिंचन, लघुपाटबंधारे, यांत्रिकी, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, या विभागाकडून करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण  या बाबत यंत्रणानिहाय कामांच्या सद्यस्थितीचा व खरीप हंगामात केली जाणारी खरीप/ रब्बी पीक कर्ज वाटप, खतांचे वाटप इ. कामे यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम यांनी प्रारंभी तालुकानिहाय टंचाई आढावा घेतला. जिल्हयात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कशी आहे, चारा उपलब्धतेचे प्रमाण, आतापर्यंत केलेल्या कामाची सद्यस्थिती, उपलब्धता याचीही विस्तृत माहिती घेतली. टंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी क्षेत्रिय स्तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्या समस्या, मागण्या समजावून घ्याव्यात, आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर वाढवावेत. जिल्हाधिकारी स्तरावर टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातील, असेही ते म्हणाले.  पिण्याच्या पाणासाठी आवश्यकतेनुसार टँकर भरण्याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्यात यावा. जिल्हयात चारा छावण्यांबाबत मागणी असल्यास याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत. पिण्याचे पाणी, चारा टंचाईबाबतीत तातडीने उपाययोजना कराव्यात. अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे. महत्त्वाची विकास कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली  आहे.यावेळी लघुसिंचन, लघुपाटबंधारे, यांत्रिकी, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, या विभागाकडून करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण  या बाबत यंत्रणानिहाय कामांच्या सद्यस्थितीचा व खरीप हंगामात केली जाणारी खरीप/ रब्बी पीक कर्ज वाटप, खतांचे वाटप इ. कामे यांचा आढावाही घेण्यात आला. सर्वांनी चांगला समन्वय ठेवून कामे करावीत असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.यावेळी  जिल्हयातील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीdroughtदुष्काळNavalkishor Ramनवलकिशोर राम