शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune: क्रिकेट खेळताना वाद; तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:36 IST

ही घटना शनिवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली....

चाकण (पुणे) : क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. रक्ताने माखलेला तरुण जीव वाचविण्यासाठी धावत असताना त्याचा पाठलाग करून पुन्हा कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली.

आकाश बापू बनसोडे (वय २५, रा. खराबवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर बापू बनसोडे (वय २१) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश उर्फ प्रशांत बाळू फड, सम्यक दिलीप गणवीर, भीमराज मारुती कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बनसोडे आणि आरोपी हे शनिवारी सायंकाळी नाणेकरवाडीमधील जंबुकरवस्ती येथील कुशल स्वर्णाली साइटजवळ क्रिकेट खेळत होते. खेळताना आकाशने आरोपींना शिवीगाळ केली. त्या कारणावरून प्रथमेश आणि सम्यक या दोघांनी आकाशवर कोयत्याने वार केले. तर भीमराज आणि अल्पवयीन मुलाने आकाशला लाकडी दांडक्याने डोक्यावर, हातावर, चेहऱ्यावर मारून गंभीर जखमी केले.

रक्ताने माखलेला आकाश जीव वाचविण्यासाठी रस्त्याने धावत सुटला. तो पिंटू जंबुकर यांच्या घरासमोर जाऊन पडला. त्यावेळी आरोपी तिथे गेले आणि त्यांनी आकाशवर कोयत्याने वार करत तसेच लाकडी दांडक्याने मारून त्यास ठार मारले. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी