शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 16:30 IST

व्यावसायिकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

शिवणे : उत्तमनगर पोलीस हद्दीत असलेल्या अहिरे गेट येथे एका बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गणपतीची वर्गणी मागण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून कुऱ्हाड आणि दगडाने हल्ला करून व्यावसायिकाला गंभीर जखमी केले आहे.  चंद्रकांत रामकृष्ण मोरे (वय ४४ वर्षे) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. जीवन सुरेश पवार आणि दर्शन रमेश पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिनांक ३०/०८/२०२२ रोजी गणपतीची वर्गणी मागण्यावरून जीवन सुरेश पवार (वय २० वर्ष) आणि दर्शन रमेश पवार यांची चंद्रकांत रामचंद्र मोरे यांच्या बरोबर वाद झाला. त्याचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी दिनांक १/०९/२०२२ रोजी सकाळी १०.१० वाजता मोरया रेसिडन्सी शिवणे येथे असलेल्या फिर्यादीच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड तसेच दगडाने घाव घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ह्या घटनेमध्ये चंद्रकांत मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवMONEYपैसाPoliceपोलिस