रोजा सोडताना तरुणांमध्ये वादावादी

By Admin | Updated: June 2, 2017 02:29 IST2017-06-02T02:29:22+5:302017-06-02T02:29:22+5:30

रोजा सोडताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून येमेन आणि जॉर्डन येथील दोन परदेशी तरुणांमध्ये चांगलीच जुंपली. रागाच्या

Controversies among youths leaving Rosa | रोजा सोडताना तरुणांमध्ये वादावादी

रोजा सोडताना तरुणांमध्ये वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रोजा सोडताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून येमेन आणि जॉर्डन येथील दोन परदेशी तरुणांमध्ये चांगलीच जुंपली. रागाच्या भरात एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केल्याने तो जखमी झाला, तर दुसऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कोंढव्यातील येमेन हॉटेलमध्ये बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली.
मोहम्मद खालीद अब्दुल मिशाल (वय २५, रा. उंड्री, मूळ रा. जॉर्डन) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मन्सूर मुआद अलस्पी (वय २७, रा. साईगंगा सोसायटी, कोरीयंथ क्लबशेजारी, महम्मदवाडी, मूळ रा. यमन) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

Web Title: Controversies among youths leaving Rosa