शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतील चेन बुलडोझर पुरविण्याची वादग्रस्त निविदा अखेर रद्द ; 'सेटिंग' झाल्याचा काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 10:39 IST

चेन बुलडोझर मशिन पुरवण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर फेरनिविदा काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देफेर निविदा काढणार : शिवसेनेच्या नगरसेवकांचाही होता विरोध

पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोवर ओपन डंपिंग बंद केल्यानंतरही येथील कॅपिंग आणि लॅन्डफिलचे काम करण्यासाठी चेन बुलडोझर मशिन पुरवण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी हा गैरप्रकार उजेडात आणला होता.

कॅपिंग आणि लॅन्डफिलचे काम करण्यासाठी भाडेतत्वावर चेन बुलडोझर मशिन घेतली जाते. मागील चार वर्षापासून मशिन पुरवण्याचे काम मे. नॅशनल अर्थमूव्हर्स या ठेकेदारालाच दिले जात असून याच ठेकेदाराने कमी दराने निविदा भरल्याने त्यालाच काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. चार वर्षांत इंधनापासून मजुरीचेही दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत जुन्याच दराने काम करणे ठेकेेदाराला कसे परवडते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काम न करताच पालिकेचे पैसे लाटायचे असा प्रकार असल्याचाही आरोप झाला होता.

ठेकेदाराची मशिनरी ३० वर्षे जुनी असून प्रशासनाने मशिनची तांत्रिक कार्यक्षमता तपासलेली नाही. तांत्रिक कार्यक्षमतेसाठी शासनाने १५ वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. असे असताना कालबाह्य मशिनच्या माध्यमातून काम करून घेतले. तसेच एका कारखान्याचा भंगारात काढलेल्या चेन बुलडोजरची पावती जोडण्यात आली होती.कचरा डेपोवर ओपन डंपिंग बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात ओपन डम्पिंग सुरू आहे. दर कमी असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू होता. या प्रकाराला काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी विरोध केला होता. हा प्रस्ताव रद्द करून संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा