शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 19:28 IST2023-07-14T19:27:40+5:302023-07-14T19:28:18+5:30
शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन...

शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
रांजणगाव सांडस (पुणे) : मांडवगण फराटा (ता. शिरूर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पवार साहेब हेच शेतकऱ्यांचे जाणता राजा आहेत. त्यांच्या बद्दल कोणी वाईट वक्तव्य केल्यास ते आम्ही सहन करणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, शंकरराव फराटे, बाळासाहेब फराटे, राजेंद्र पोळ, महेश जाधव, माणिकराव फराटे, गणेश फराटे, धनंजय फराटे, प्रतिभा बोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.