शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Impact: वादग्रस्त होर्डिंग पुन्हा जमीनदोस्त; लोकमतचा पाठपुरावा अन् महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:44 IST

होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका 'आका' कोण असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता

हिरा सरवदे 

पुणे: टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे उभारण्यात येत असलेल्या वादग्रस्त होर्डिंगला सांगाडा महापालिकेने मंगळवारी सकाळी पुन्हा पाडला. यासंदर्भात दैनिक लोकमतने सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले.  

महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दीड वर्षापूर्वी परवानग्या दिल्याने टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागच्या बाजूला तीन होर्डिंग एकत्र करून एकच भले मोठे होर्डिंग उभारले होते. यावर प्रसार माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी  क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर, होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते. कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंग मालकाने कारवाईस स्थगिती मिळविण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२४ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते.

या घटनेस एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर, त्याच होर्डिंग मालकाकडून आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी परवानगीसंदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना पोलिसांच्या समोर दमदाटी करून हुसकावून लावण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता. त्यानंतरही पूर्वी कापलेल्या लोखंडी फाउंडेशनवरच नट-बोल्ट च्या साहाय्याने सांगाडा उभारण्यात आला. या होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका 'आका' कोण असा सवाल लोकमतने उपस्थित केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने अखेर मंगळवारी सकाळी या होर्डींगवर पुन्हा कारवाई करत ते जमिनदोस्त केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तSocialसामाजिकLokmatलोकमत