शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अजय भोसले यांच्यावर गोळीबार करण्याची छोटा राजनला सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 12:29 IST

तत्कालीन नगरसेवक अजय भोसले हे ११ नोव्हेबर २००९ रोजी निवडणुकीतील प्रचाराला जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार..

ठळक मुद्दे सीबीआयच्या तपासातून माहिती आली समोर : न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार

पुणे : भावा भावामधील वाद मिटविण्यासाठी मदत करत असताना एका बांधकाम व्यावसायिकाने थेट कुख्यात डॉन छोटा राजनला नगरसेवक अजय भोसले यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्या अटकपूर्व जामीनला विरोध करताना सीबीआयने दाखल केलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आली आहे. यावर शिवाजीनगर येथील सीबीआय न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. याबाबतची माहिती अशी, तत्कालीन नगरसेवक अजय भोसले हे ११ नोव्हेबर २००९ रोजी सकाळी साडेदहा वाजता मोटारीतून निवडणुकीतील प्रचाराला जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. त्यात त्यांचा चालक शकील सय्यद हे जखमी झाले होते. याप्रकरणाचा पुणे पोलिसांना छडा न लागल्याने हा गुन्हा सीआयडीकडे सोपविला होता. डिसेंबर २०१० मध्ये सीआयडीने गोळीबार करणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न केली होती. मात्र, त्यांना कोणी सुपारी दिली़ या हल्ल्यामागे कोण आहे, याचा शोध न लागल्याने अजय भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या गुन्ह्याचा तपास सीबीआयला दिला. त्यातून बांधकाम व्यावसायिक रामकुमार अगरवाल व एस. के. अगरवाल यांच्यातील कौटुंबिक मालमत्तेवरुन वाद होता. त्यात छोटा राजन याने अजय भोसले यांना मध्यस्थी करण्यास सांगितले होते. मात्र, तो त्यांचा कौटुंबिक मामला असल्याने भोसले यांनी मध्यस्थी करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यानंतर रामकुमार अगरवाल यांच्याबरोबर अजय भोसले हे सारखे असतात. याकारणावरुन एस. के. अगरवाल यांनी छोटा राजनला भोसले यांची सुपारी दिल्याने निष्पन्न झाले. छोटा राजनला भारतात आणल्यावर पोलिसांनी अटक केली. सीबीआयने त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही बाब समोर आल्याचे निष्पन्न झाल्याचे सीबीआयने पुण्यातील सीबीआय न्यायालयात एस. के. अगरवाल यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालयFiringगोळीबार