ंमहात्मा फुलेंच्या विचारांचा सातत्याने अभ्यास व्हावा

By Admin | Updated: November 28, 2014 23:11 IST2014-11-28T23:11:23+5:302014-11-28T23:11:23+5:30

‘हजारो वर्षाच्या चुकीच्या परंपरा तोडणारा, जगात मानवतावादीची भावना जोपासणारा समाज देदीप्यमान झाला पाहिजे.

Continuous study of thoughts of Mahatma Phule | ंमहात्मा फुलेंच्या विचारांचा सातत्याने अभ्यास व्हावा

ंमहात्मा फुलेंच्या विचारांचा सातत्याने अभ्यास व्हावा

खळद : ‘‘हजारो वर्षाच्या चुकीच्या परंपरा तोडणारा, जगात मानवतावादीची भावना जोपासणारा समाज देदीप्यमान झाला पाहिजे. महात्मा फुले कोणालाही न घाबरणारे असे क्रांतिकारक होते. महात्मा फुलेंचा केवळ जयजयकार न होता विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी साहित्य संमेलने व त्यांचे विविध कार्यक्रम ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य 
यांनी केले. 
खानवडी (ता. पुरंदर) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सातवे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन दि. 27 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या मूळ गावी झाले. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास भाई वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. या वेळी  अध्यक्षस्थानी डॉ. सय्यद जब्बार पटेल व स्वागताध्यक्ष पोपटराव कटके हे उपस्थित होते. या वेळी भाई वैद्य बोलत होते.
या संमेलनास दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे, विजय कोलते, सरपंच चंद्रकांत फुले, आबा भोंगळे, रवी फुले, कुंडलिक मेमाणो, अरविंद म्हेत्ने, विजयराव तुपे, मानसिंग गावडे, सुरेश वाळेकर, महादेव खेंगरे पाटील, उत्तम टिळेकर, छाया नानगुडे, विमल सोनवणो, अलका बनकर, सुजाता गुरव, गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.
पुढील वर्षापासून या संमेलनासाठी ‘आचार्य अत्ने विकास प्रतिष्ठान’च्या वतीने 21 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा विजय कोलते यांनी केली. स्वागताध्यक्ष पोपटराव कटके यांनीही विचार व्यक्त केले. उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दत्ता भोंगळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, उपाध्यक्ष नंदकुमार दिवसे, सासवड शहर अध्यक्ष गणोश मुळीक, खानवडीचे सरपंच चंद्रकांत फुले, रवींद्र फुले, चंद्रकात टिळेकर, सुनील धिवार, सुजाता गुरव, गंगाराम जाधव, दत्ता होले आदींनी संमेलनाचे आयोजन केले. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ यादव यांनी सूत्नसंचालन केले. स्वागताध्यक्ष पोपटराव कटके यांनी आभार मानले.(वार्ताहर)
 
संत व समाजसुधारक कोणत्या जातिधर्मासाठी जन्माला आलेले नसतात; मात्न राजकीय लोक हे सातत्याने जातीयवादीच विचार करतात. या संमेलनातून नवोदित साहित्यिकांना सन्मानित केले जावे.
- डॉ. सय्यद जब्बार पटेल 

 

Web Title: Continuous study of thoughts of Mahatma Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.