शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला देखील बाहेर पडण्याची परवानगी असे समजून "कंटेन्मेन्ट" भागातील नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:38 IST

शहरातील जवळपास 69 ठिकाणे ही अतिसंक्रमणशील म्हणून घोषित

ठळक मुद्देकंटेन्मेन्ट भागात बँकेत, पेट्रोलपंप, किराणा मालाची दुकाने याठिकाणी गर्दी

पुणे :  कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी एकीकडे राज्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अद्याप नागरिकांमध्ये परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. रविवारी रात्री उशिरा कोरोना संक्रमणशील भाग वगळता बाकीच्या भागातील सर्व व्यवहार सुरु करण्याचे आदेश पालिका प्रशासनने दिले. मात्र,  कंटेन्मेन्ट भागात या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे चित्र सोमवारी पाहवयास मिळाले. इतरांप्रमाणेच आपल्याला देखील बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे असे समजून या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बँकेत, पेट्रोलपंप, किराणा मालाची दुकाने याठिकाणी गर्दी केली होती.   शहरातील जवळपास 69 ठिकाणे ही अतिसंक्रमणशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने शहरातील मध्यवस्तीचा भाग, प्रमुख पेठा तसेच कोंढवा, मुंढवा, घोरपडी, लडकतवाडी, ढोले पाटील रस्ता, पुणे स्टेशनचा परिसर, ताडीवाला रोड, यांचा समावेश आहे. संक्रमणशील भाग वगळता इतर भागातील सेवा अंशत: सुरु करण्यात येतील असे पालिका प्रशासनने सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील या भागात नागरिकांची वर्दळ वाढली. मोठ्या संख्येने वाहनांची रहदारी वाढल्याचे दृश्य पाहवयास मिळाले. जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. असे असले तरी नागरिकांची वाढलेली गर्दी चिंतेचा विषय ठरली. लष्कर परिसरात काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. नागरिक शिस्तीचे पालन करुन योग्य अंतर ठेवून किराणा मालाच्या दुकानाबाहेर उभे होते. पेट्रोलपंपावर देखील केवळ जीवनावश्यक सेवा वगळता अन्य कुणाला पेट्रोल दिले जात नव्हते. शहराचा इतर भाग सुरु  असल्याने त्यात आपल्याही भागाचा समावेश केला आहे असा अनेकांचा समज झाल्याने अनेकजण घराच्या बाहेर पडले. विशेषत: अशा नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. यासगळयात बहुतांशी नागरिकांनी बँकांच्या बाहेर लांब रांगा लावल्या होत्या. कँम्पातील वेगवेगळया बेक-यांबाहेर देखील नागरिक मोठ्या संख्येने उभे असल्याचे दिसून आले. 

* सोमवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ याबरोबरच एम जी रोड,  बाबाजान चौक, गोळीबार मैदान, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता, हा भाग कोरोना अतिसंक्रमनशील भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. सोमवारी शहरातील इतर भागात दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असताना मात्र या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. जीवनावश्यक व आरोग्यविषयक महत्वाच्या सेवा वगळता अन्य कुठलीही सेवा सुरु या भागात सुरु नव्हती. सध्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण या भागातून असून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस