कात्रज (पुणे) : कात्रज बायपासकडून देहूरोडला जाताना सकाळी नऊच्या सुमारास बारा चाकी कंटेनर आणि मोटरसायकलचा अपघात झाला. यामध्ये संतोष दिलीप तिखट (रा. सोलापूर ) हे कंटेनरच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने त्याच्या पोटावरून चाक गेल्याने ते खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस हवलदार प्रणव सपकाळ यांनी वॉर्डनच्या मदतीने त्यांना बाजूला घेतले. जखमीला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भारती विद्यापीठ पोलिसांकडून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. कंटेनर चालक विठ्ठल बाबासाहेब गीते (वय. 26 वर्ष) रा. मसोबावाडी, ता. आष्टी जिल्हा बीड याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.