शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

कंटेनर लुटणारी टोळी पकडली, आणे घाटात कारवाई, १४ लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:15 IST

अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील घाटात कंटेनरचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गाय छाप तंबाखूचा माल लुटणाºया ९ जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसांतच दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

नारायणगाव : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील आणे (ता. जुन्नर) येथील घाटात कंटेनरचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गाय छाप तंबाखूचा माल लुटणाºया ९ जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसांतच दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.कंटेनरचालक अमोल दशरथ शिंदे हा गुरुवारी (दि.७) कंटेनरमध्ये (एमएच १७, बीडी २७२) संगमनेरहून गाय छाप तंबाखूच्या बॅगा, भुगी तंबाखू, मशेरी असा १४ लाख ४२ हजार ६८२ रुपयांचा माल घेऊन आळेफाटा मार्गे निपाणीकडे आणे घाटातून जात असताना अचानक मागील बाजूकडून नंबर नसलेली पांढºया रंगाची स्कोर्पिओ गाडी कंटेनर समोर आडवी घालून त्यातील आठ जण उतरले. त्यातील एकाने शिंदे याच्या डोक्याला पिस्तूलाचा धाक दाखवून खाली ओढून स्कोर्पिओ गाडीत जबरदस्तीने बसविले. एकाने कंटेनरचा ताबा घेऊन शिरूरमार्गे कंटेनर सणसवाडी येथे आणला. तेथे शिंदे यांचे हात पाय बांधून ठेवले. कंटेनरमधील सर्व तंबाखू माल दुसºया एका कंटेनरमध्ये टाकून चोरून नेला होता.आळेफाटा पोलिसांनी ८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. या गंभीर गुन्ह्याची दाखल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी या घटनेची दखल घेत घेऊन या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर व सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांचे दोन पथक तयार करून, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, विजया पाटील, राजू मोमीन, महेश गायकवाड, नीलेश कदम, पोपट गायकवाड, रवी शिंगणारे, किशोर कोरडे, शंकर जम, आरुटे, चंदनशिव, लिमण, रौफ इनामदार, नितीन दळवी, सचिन गायकवाड, विद्याधर निचित, प्रमोद नवले यांच्या पथकाने पुणे, अहमदनगर, नवी मुंबई आदी जिल्ह्यांमध्ये तपास सुरू केला.किरकोळ व घाऊक तंबाखू विक्री करणारे दुकानदार, व्यापारी यांची चौकशी करताना या पथकास खबºयाकडून माहिती मिळाली. त्या नुसार कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणे