कंटेनरची स्कॉर्पिओला धडक; १ ठार ३ जखमी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:09 IST2021-07-01T04:09:18+5:302021-07-01T04:09:18+5:30

सदरचा अपघात मंगळवारी (दि.२९) रात्री पावणेबाराच्या सुमारास हॉटेल रसिकालगत असलेल्या आळंदी फाट्यावर घडला. किरण बारकू सातपुते (वय ३५ रा. ...

The container hits Scorpio; 1 killed, 3 injured. | कंटेनरची स्कॉर्पिओला धडक; १ ठार ३ जखमी.

कंटेनरची स्कॉर्पिओला धडक; १ ठार ३ जखमी.

सदरचा अपघात मंगळवारी (दि.२९) रात्री पावणेबाराच्या सुमारास हॉटेल रसिकालगत असलेल्या आळंदी फाट्यावर घडला. किरण बारकू सातपुते (वय ३५ रा. आळंदी - देवाची ता. खेड) असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. तर स्कॉर्पिओ चालक वैजनाथ मुगावकर (वय ३४ रा. मेदनकरवाडी ता. खेड) यांच्यासह ज्ञानेश्वर आंब्रे व निलेश भोंडवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात स्कॉर्पिओ गाडीच्या एका बाजूचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह शिक्रापूर बाजूकडे पोबारा केला.

शेलगाव (ता.खेड) हद्दीत कंटेनरच्या धडकेत स्कॉर्पिओचा झालेला चक्काचूर.(छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: The container hits Scorpio; 1 killed, 3 injured.