शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 16:34 IST

नसरापूर उड्डाणपूल संपताना येणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडल्याने येथे नेहमी अपघात होत असतात

नसरापूर : नसरापूर (ता. भोर) येथील पुणे सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल नंतरच्या देगाव फाट्यावरील दोन पूलांच्या मध्ये गेल्याने अडकला आहे. या अपघातात दोन जण गंभीर झाले आहे. भरधाव कंटेनरने कारला धडकल्याने कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत .       पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या औषधाने भरलेला कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सर्जेराव सखाराम पाटील (वय ६०), बायक्का सर्जेराव पाटील (वय ५०), प्रवीण सखाराम पाटील (वय ३५), इरा पाटील (वय साडे ३ वर्ष ) सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे आहेत . हा अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. सर्जेराव पाटील व त्यांची पत्नी बायका पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.         या अपघाता नंतर महामार्गावर देगाव फाटा ते वरवेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना तातडीने कार व कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू करावे लागले. नसरापूर उड्डाणपूल संपताना येणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडले असून तो अरुंद आहे. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. हे अपघात प्रवणक्षेत्र बनले आहे.           मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावर पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाने अचानक कार दुसऱ्या लेन वर घेतल्याने मागून येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारला धडक देत थेट महामार्गावरील पुलाच्या मधोमध जाऊन कंटेनर लटकला आहे. या अपघातामुळे दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही, मात्र पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातhighwayमहामार्गcarकारhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर