शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रुपाली चाकणकरांशी संपर्क साधला; पण त्यांनी मला उत्तर नाही दिलं, कुचिक प्रकरणातील तरुणीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:27 IST

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणातील गायब झालेल्या तरुणीची पुण्यात पत्रकार परिषद

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणाला आता वेगळेच वळण येऊ लागले आहे. मध्यंतरी या प्रकरणातील तरुणी गायब झाली होती. काही दिवसांनी तिचा शोधही लागला. आता खूप दिवसानंतर ही तरुणी समोर आली आहे. पुण्यात या तरुणीने पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळवण्यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. यावेळी 'मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला उत्तर दिलं नसल्याचा दावा या पीडित तरुणीने पत्रकार परिषदेत केला आहे. 

''या सगळ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने , तरुणी आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली. आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली तसच न्याय मलाही मिळावा अशी अपेक्षा पीडित तरुणीने बोलताना व्यक्त केली आहे.'' 

तरुणीचा कोर्टात जाण्याचा इशारा

रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत. आत्तापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे  माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता. पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी तिने केली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं देखील तिने पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

माझा गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं; तरुणीचा आरोप 

रघुनाथ कुचिक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही. असं वैद्यकीय रित्या सिद्ध झाल्याचे सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचिक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझा गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होता असा आरोप देखील तिने केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीShiv SenaशिवसेनाCourtन्यायालय