पुणे : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आॅनलाईन होत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सेवा हमी कायद्यांतर्गत एकूण चौदा सेवा आॅनलाईन केल्या आहेत. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून दिल्या जाणाऱ्या परवान्यांची सेवा आॅनलाईन मिळणार असल्याने ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. या सेवा आॅनलाईन करण्यात आलेल्या असल्या तरी अद्याप अर्ज प्राप्त झाल्यावर किती कालावधीत अनुज्ञप्ती अगर सेवा प्रदान केली जाईल याबाबत कालावधी मात्र निश्चित करण्यात आलेला नाही. आॅनलाईन करण्यात आलेल्या सेवांमध्ये एक दिवसीय कार्यक्रमांसाठी देण्यात येणा-या परवानगीसह यासोबतच तात्पुरत्या कार्यक्रमांचे परवाने, देशी विदेशी दारु प्यायचे परमीट, देशी विदेशी दारु खरेदी, बाळगणे, वाहतूक, वापर आणि प्राशन करण्याचा परवाना, वितरण आणि आयात परवाना, हॉटेलमध्ये मद्यविक्रीसाठीचे परवाने, क्लबमध्ये मद्यविक्रीचे परवान्यांचा यामध्ये समावेश आहे. वाईन आणि बिअरच्या बाटलीबंद विक्रेत्यांसाठीचे परवाने, हॉटेल, रेस्टॉरंट्स, कॅन्टीन, क्लबमध्ये विक्रीचे परवाने, एक दिवसीय मद्य खरेदी, साठा करणे, वाहतूक आणि वापर याचे परवाने आदी प्रकारचे परवाने आॅनलाईन करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावरुन या सेवेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. महाआॅनलाइनच्या साह्याने स्वतंत्र संगणकीकृत सेवा सेतूच्या माध्यमातून देण्याचे नियोजित करण्यात आले आहे. महाआॅनलाइन कडून विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीची चाचणी पुणे जिल्ह्यात केली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास राज्यभरात लागू केली जाणार आहे. आॅनलाईन पद्धतीमध्ये ई चलन आणि ई पेमेंटची सुविधा असणार आहे.
ग्राहकांच्या वेळेची होणार बचत!; सेवा हमी कायद्यांतर्गत राज्य उत्पादनच्या सेवा ‘आॅनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:20 IST
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आॅनलाईन होत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सेवा हमी कायद्यांतर्गत एकूण चौदा सेवा आॅनलाईन केल्या आहेत.
ग्राहकांच्या वेळेची होणार बचत!; सेवा हमी कायद्यांतर्गत राज्य उत्पादनच्या सेवा ‘आॅनलाईन’
ठळक मुद्देमहाआॅनलाइनच्या साह्याने स्वतंत्र संगणकीकृत सेवा सेतूच्या माध्यमातून देण्याचे नियोजनआॅनलाईन पद्धतीमध्ये ई चलन आणि ई पेमेंटची असणार सुविधा