शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

ग्राहक आयोगाचा इन्श्युरन्स कंपनीला दणका; तक्रारदाराला ८ लाख ६९ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 2:00 PM

तसेच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास, तक्रारीचा खर्च असे सर्व मिळून ५० हजार रुपये देण्याचा निकाल..

ठळक मुद्देवाकड येथील गारवेल मोटर्समधून घेतली होती १२ लाख ७२ हजार रुपयांना कार

पुणे : कारची विमा रक्कम न देणाऱ्या इन्श्युरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदाराला ८ लाख ६९ हजार रुपये ९ टक्के व्याज दराने द्यावेत. तसेच आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास, तक्रारीचा खर्च असे सर्व मिळून ५० हजार रुपये देण्याचा निकाल जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी दिला आहे.याप्रकरणी राजेश श्रीराम चौबे (रा़ बाणेर) यांनी गो डिजिट जनरल इन्श्युरन्स या कंपनीविरुद्ध तक्रार केली होती. चौबे यांनी वाकड येथील गारवेल मोटर्समधून १२ लाख ७२ हजार रुपयांना कार घेतली. त्यासाठी त्यांनी बँकेकडून ९ लाख ८० हजार रुपयांचे वाहनकर्ज घेतले. कारसाठी त्यांनी नोव्हेबर २०१९पर्यंतचा विमा घेतला होता. तो ८ लाख ७१ हजार रुपयांचा विमा करार निश्चित करण्यात आला होता. विमा आकारणीच्या रक्कमेत विनादावा सुट देण्यात आली. मात्र ही सुट अनावधाने देण्यात आल्याचे लक्षात आल्यावर विमा कंपनीने त्यांना कळविले. त्यानुसार चौबे यांनी सुट दिलेली रक्कम परत जमा केली. पुणे -बारामती रोडवर मे २०१९ मध्ये तक्रारदार चौबे यांच्या कारला अपघात झाला. कार दुरुस्तीच्यावेळी कंपनीकडून विनादावा सुट रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराने पाठपुरावा केल्यावर केवळ इतर भागांचा विमा मंजूर होईल. इंजिनाची नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराकडून कागदपत्रे घेऊन वाहनाचे विक्री मुल्या ३ लाख ७५ हजार रुपये निश्चित करण्यात आले. तसेच ४५ दिवस कार सांभाळल्याचे तक्रारदाराकडूनच १३ हजार रुपये घेण्यात आले. विमा रक्कमही तक्रारदाराला देण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराला कर्जापोटी १५ हजार ९६७ रुपये द्यावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. ग्राहक आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तक्रारदाराची तक्रार ग्राह्य धरुन विमा रक्कम व्याजासह परत द्यावी. वाहन सांभाळण्याचे १३ हजार रुपये शुल्क, वाहन दुरुस्तीला नेण्याचे २ हजार ९०० रुपये, तीन महिने कर्ज परतावा रक्कम ४७ हजार ९०१ रुपये, तसेच पुढील कर्ज परतावा रक्कम, नुकसान भरपाई रक्कम १ लाख २५ हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च ५० हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेcarकारAccidentअपघात